लाचप्रकरणी तहसीलदारास जामीन

पुणे – एक कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांची 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लवासा रस्त्यावर ही कारवाई केली होती. वारसनोंदीच्या प्रकरणात निकालपत्र आणि सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तक्रारदाराचे वारसनोंदीचे प्रकरण मंत्रालयातून फेरचौकशीसाठी मुळशीचे तहसीलदार डोंगरे यांच्याकडे आले होते. या प्रकरणात निकालपत्र आणि सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराकडून एक कोटी रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या रकमेत 15 लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि उर्वरित कागद ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डोंगरे यांनी अर्ज दाखल केला होता. डोंगरे यांच्यातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. हेमंत झंजाड, ऍड. नंदकुमार शिंदे यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)