लाचखोर महिला अधिक्षक, लिपिकाला पोलीस कोठडी

पुणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजुर करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधिक्षक शिल्पा मेनन आणि लिपिकाला दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, मेनन हिच्याकडे तपासात केला असता तिने ही लाच “दराडे मॅडम’ म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या सांगण्यावरून स्विकारली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिली आहे.

माझ्या सांगण्यावरून पैसे स्विकारल्याच्या मेनन यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. संबंधित शाळेची काय काय तक्रार आहे, हे पाहून शाळेची शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मी मेनन यांना सांगितले होते. पुढे काय झाले, ते मला माहीत नाही. – शैलजा दराडे, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद

सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात गुरुवारी सकाळी अधिक्षक शिल्पा सुरेश मेनन (45, रा.रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्‍लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (47, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले होते.

तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे 17 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते. हे बिल मंजूर करून ती रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (10 टक्के) लाच मागितली होती. परंतु, लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली होती.

मेनन आणि सारूक या दोघांना 50 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात अटक झाली. दोघांना शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सापळा रचलेल्या दिवशी झालेल्या संभाषणात मेनन हिने साहेबांचा फोन आला होता, तुमचे बील 22 लाखांपर्यंत गेले आहे, असे ध्वनीमुद्रीत झाले आहे. साहेब म्हणजे नक्की कोणते साहेब, त्यांचा गुन्ह्यात खरोखरच सहभाग आहे का? याबाबत दोघांकडे तपास करायचा आहे. मेनन हीने लाचेची रक्कम मी दराडे मॅडमच्या सांगण्यावरून स्विकारण्यास गेले असल्याचे एसीबीला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का? याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्कम ही मोठी असून त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत तपास करायचा आहे.

आरोपी लोकसेवक यांनी नजीकच्या कालावधीतील केलेली कामे आणि रेकॉर्ड तपासून आणखी कोणाकडून लाच स्विकारली आहे. याबाबतचाही तपास करणे आवश्‍यक आहे. मेनन आणि सारूक या दोघांच्याही आवाजाचे नमुणे घेणे आवश्‍यक असल्याने दोघांनाही पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. एसीबीचे पुणेचे पोलीस निरीक्षक अरूण घोडके गुन्ह्याचा तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)