लाचखोर गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे-खरेदी केलेल्या फ्लॅटवरील मुद्रांक आणि नोंदणी शुल्क शासनाने माफ केलेले असताना सुद्धा सोसायटीबरोबर ऍग्रीमेंट करावे लागते, असे सांगून उपनिबंधक आणि वकिलांना 75 हजार रुपये द्यायचे असल्याचे सांगून लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या सचिवाच्या पोलिस कोठडीत 12 सप्टेंबरपर्यंत ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌वाढ करण्यात आली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे.
याप्रकरणी, कोंढवा परिसरातील संत ज्ञानेश्वर नगरमधील भगवान गौतम बुद्ध गृहनिर्माण संस्थेचा सचिव दिलीप संतराम कांबळे (45 ) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दाखल केली आहे. कांबळे हा लाच मागत असल्याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने खरेदी केलेल्या फ्लॅटवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क शासनाने माफ केले होते. तरी आरोपीने त्यांच्याकडे सोसायटीबरोबर ऍग्रीमेंट करावे लागते व त्यासाठी उपनिबंधक आणि वकिलांना 75 हजार रुपये द्यायचे असे सांगून लाच मागितली होती. कांबळेला लाच घेताना रंगेहाथ पकड्‌ण्यात पकडण्यात आले होते. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. आरोपीने घेतलेली लाचेची रक्कम कोणासाठी स्वीकारली यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील कुणाचा सहभाग आहे का, या गृहरचना संस्थेच्या चेअरमनकडे आरोपीच्या समक्ष तपास करायचा आहे. संस्थेच्या चेअरमनने यापूर्वी अशा प्रकारचे खरेदीखत केल्याची माहिती मिळाली असून त्याचा तपास करायचा आहे.हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातून या संस्थेच्या सदनिकांचे खरेदीखत वकिलाकडून करुन घेण्यात आल्याचा तपास करायचा असून त्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी वकील अगरवाल यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)