लाचखोर एपीआयसह दोघांना पोलीस कोठडी

पुणे- सासवड येथील न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात जामीन मंजूर होण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्या सासवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका वकिलाला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावाण्यात आली. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा आदेश दिला.

सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद काशीनाथ पालवे(42) आणि श्रीकांत बाळासाहेब ताम्हाणे (29, रा.इखतपुर, इंदापुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराविरुध्द सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला सासवड न्यायालयात जामीन मंजुर होण्यासाठी मदत करण्यासाठी पालवे यांनी दीड लाखाची लाच मागितली होती. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणण्यात दाखल झाली होती. त्याप्रमाणे तक्रारीची गुरुवारी शहानिशा करण्यात आली. तडजोडी अंती एक लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. सापळ्यामध्ये पालवे यांच्यावतीने श्रीकांत ताम्हाणेला एक लाख रुपयांची लाच स्विकाताना इंदापुर तालूक्‍यातील मौजे इखतपुर येथे पकडण्यात आले. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)