लाचखोरीत साताऱ्याची आघाडी…

प्रशांत जाधव 

तीन वर्षात 2 हजार 300 जण सापळ्यात

सातारा- शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खिशे गरम केल्याशिवाय कामे मार्गी लागतच नाहीत हा नागरिकांचा अनुभव आहे.लाचखोरांना जरब बसवण्यासाठी एसीबीने विधि उपाययोजना केल्या तरीही लाचखोर आणि लाच देणारे असे दोघेही हुशार झाल्याने या विभागाला कारवाई कराताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यावर मात करत एसीबीने कारवाई व शिक्षेच्या आकड्यात कमालीची वाढ केल्याने दिसुन येत आहे.कामे करताना सरकारी आणि निमसरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हात धुऊन घेत “लाचखोरीचा पराक्रम’ केल्याची प्रकरणे वाढली आहेत.

लाच देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचखोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. त्याशिवाय भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होणार नाही.
– सुहास नाडगौडा, उपअधीक्षक,लाचलुचपत सातारा विभाग.

नागरिकांची विविध कामे करुन देण्यासाठी या अधिकाऱ्यांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत पुणे विभागातील 2 हजार 300 हुन जास्त अधिकारी ऍन्टी करप्शनच्या सापळ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे, या लाचखोरीत पुणे विभागातील पुणे शहर आणि जिल्हा आघाडीवर असून सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

“लाच घेतल्याशिवाय नागरिकांची कामे करायची नाहीत’ असा नियम लावण्यात काही शासकीय तसेच निमशासकीय अधिकाऱ्यांचा हातखंडा आहे. तर आपली कामे जलद करुन घेण्यासाठी नागरिकही लाच देण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच या सरकारी बाबूंना कशाचीही भीती राहिलेली नाही.

मात्र, त्याचा त्रास प्रामाणिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत असताना त्यांना कारवाई करण्यात मोठ्याप्रमाणात यश मिळत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन सापळा, अन्य भ्रष्टाचार,असंपदा या तीन प्रकारत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे वर्गीकरण केले जाते. या तीनही प्रकारात कारवाई केलेले हे चतुर्थ श्रेणीपासुन ते वर्ग एक पर्यंतचे अधिकारी यांचा समावेश असतो.महसुल,पोलिस,वन विभाग,विद्युत वितरण,महानगरपालीका यांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसुन येतो. एसीबीने केलेल्या कारवाईत 300 रुपयापासुन ते लाखो रुपया पर्यंतची लाच मागितली जात असलेल्या प्रकरणांची नोंद दिसुन येते.

..तक्रारदारांची कामे मार्गी लावण्यात पुढाकार
“लाच मागितल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आपली कामे होणार नाहीत’ अशी भीती संबधित तक्रारदारांना वाटत होती. त्याची गंभीर दखल घेऊन संबधित तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कामे करुन देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही घोषणाच करुन न थांबता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी केली असून नागरिकांना ही कामे करुन दिली आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणे पुढे सरकली आहेत.

असंपदा म्हणजे काय ?
शासकीय नोकरदाराने त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवणे व त्या मालमत्तेचा हिशोब विचारल्याच असमाधानकारक उत्तरे देणे या प्रकरणाला असंपदा प्रकरण असे म्हटले जाते.

अन्य भ्रष्टाचार म्हणजे काय ?
शासकीय निधी किवा अनुदान जर शासकीय नोकराने त्याच्या स्वताच्या फायद्यासाठी वापरले तर त्या प्रकरणाला अन्य भ्रष्टाचार असे बोलले जाते.

सापळा म्हणजे काय ?
काम करण्यासाठी एखाद्याला जर कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केली व त्याची तक्रार एसीबीकडे आली तर त्या तक्रारीवरून एसीबीने सापळा लावत
लाच मागणाऱ्या लोकसेवकाला रंगेहात पकडले तर त्याला सापळा कारवाई म्हणतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)