लाचखोरांना करावे लागणार अकार्यकारी पदावर काम

शासनाच्या सूचना : मुळ पदाचा पदभार घेण्यास मज्जाव

पुणे – लाच घेतल्याप्रकरणी अटक होऊन जामीन मंजूर झाल्यानंतर संबंधीत अधिकारी अथवा कर्मचारी मूळ पदावर काम करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी मूळ पदाचा पदभार स्विकारू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. तसेच लाचखोर अधिकारी अथवा कर्मचारी यांना अकार्यकारी पदावर काम करण्यास सांगावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईमध्ये अथवा अन्य फौजदारी प्रकरणात गुन्हा नोंद होऊन अटक करण्यात येते. अटक झाल्यानंतर संबंधीत अधिकारी यांच्याबद्दलची लाचलुचपत अथवा पोलीस विभागाकडून केलेल्या कार्यवाहीची माहिती प्राप्त होण्यास संबंधीत शासनाच्या विभागास उशीर होतो. त्यामुळे त्या लाचखोर अधिकाऱ्याला निलंबनाचा आदेश देण्यास वेळ लागतो. याचा फायदा घेत लाचखोर अधिकारी जामीन मिळाल्यानंतर पुन्हा मूळ पदावर काम करत असल्याचे आढळून आले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने एक परिपत्रक जारी केले असून लाचप्रकरणी अटक केल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याविरोधात काय कार्यवाही करण्यात यावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

लाचप्रकरणी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास अटक केल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडील पदभार अन्य समकक्ष अथवा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा. अटक केल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यास जामीन मिळाल्यानंतर मूळ पदावर काम करण्यास प्रतिबंध करावा. लाचखोर अधिकाऱ्यास वरिष्ठ कार्यालयात अकार्यकारी पदावर काम करण्यास सांगण्यात यावे. लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यास धोरणात्मक अथवा वैधानिक अधिकार असलेले कामकाज देण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)