‘लागीर झालं जी’ फेम अजिंक्‍यला झाली दुखापत

छोट्या पडद्यावरील ‘लागीर झालं जी’ मालिकेतील अजिंक्‍य आणि शीतलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेसाठी काही फाईट सिन्स शूट करताना अजिंक्‍यला अनेक ठिकाणी खरचटले. मात्र तरीही त्याने दुखापतीकडे लक्ष न देता मोठ्या जिद्दीने बराच वेळ फाईट सिन्सचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

प्रेक्षकांना लवकरच मालिकेत एक मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या मालिकेत अजिंक्‍य शीतलला लग्नाची मागणी घालतो, त्यांच्या नात्या विषयी जेव्हा हर्षवर्धनला कळते तेव्हा ही गोष्ट वेगळ्याच थराला जाऊन पोचते. हर्षवर्धनचा राग अनावर होतो आणि अजिंक्‍यला मारण्यासाठी तो गुंड पाठवतो. भारतीय सेनेत भरती झालेला अजिंक्‍य या सगळ्याला कसा समोर जातो हे आता पाहण्यासारखे असणार आहे. यामुळे अजिंक्‍य-शीतलच्या नात्याला वेगळे वळण मिळणार का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मालिकेतून मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)