लाखो वाहनांच्या तपासणीसाठी दोनच निरीक्षक

– गणेश राख

पुणे- नियमबाह्य पद्धतीने वाहनांना योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी राज्य परिवहन विभागातील 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अनेक वाहनांना असे नियमबाह्य प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात दि.8 ते 23 ऑक्‍टोबरदरम्यान वाहन तपासणी मोहीम राबवण्याचे सांगण्यात आले होते. तशा सूचना राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुणे आरटीओने यासाठी एक पथक तयार केले असून त्यात केवळ दोन मोटार निरीक्षकांचा समावेश आहे. शहरातील वाहनांची संख्या 37 लाखांवर गेल्याने दोन अधिकाऱ्यांकडून कितपत मोहीम यशस्वी होऊ शकेल, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

-Ads-

योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसलेल्या तसेच सार्वजनिक रस्त्यावर चालण्यास धोकादायक असलेल्या सदोष वाहनांची तपासणी करण्यासाठी 23 ऑक्‍टोबरपर्यंत या कालावधीत राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने तसेच योग्यता प्रमाणपत्र आहे. परंतु, रस्त्यावर चालण्यास धोकादायक असणारी वाहने तपासणी जाणार आहेत. यात प्रामुख्याने माल व प्रवासी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीत फिटनेस प्रमाणपत्र नसणारी वाहने थेट गॅरेजमध्ये लावली जाणार आहेत. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना वाहने दुरुस्त करावी लागणार आहेत. यानुसार आरटीओ कार्यालयाने सोमवारपासून (दि.8) कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज 37 लाखांपेक्षा जास्त वाहने धावत आहेत. यात दुचाकींची संख्या लक्षणीय आहे. यामुळे ही सर्व वाहने तपासणीसाठी या पथकावर मर्यादा येणार असून तपासणी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. पंधरा दिवसांत शहरातील लाखो वाहने तपासण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर असल्याने मोहीम कागदावरच राहणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी एकच पथक –
वाहनांची तपासणी काटेकोरपणे न केल्याने शासनाने 37 वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित केले. त्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक 17 जणांचा समावेश होता. यामुळे याचा सर्वाधिक फटका पुणे कार्यालयाला बसला असून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे केवळ एक पथक तयार करण्यात आले असून वाहनांची संख्या विचारात घेता तपासणीसाठी अधिक पथकांची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)