लाखो लीटर पाणी जातेय वाया

कुसगाव बुद्रुक – दुधिवरे-पवनानगर महामार्गावर जलवाहिनीतून अनेक दिवसांपासून गळती होत आहे. त्यातून रोज अनेक लीटर पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, जलवाहिनीतून रस्त्याच्या कडेला गळती होऊन ही धरण प्रशासनाचे याकडे लक्ष का नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे. पाणी गळतीसारखा गंभीर प्रश्‍न असूनही प्रशासन कानाडोळा करत आहे. पवना धरण प्रशासनाने या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन जलवाहिनीमधून पाणी लिकेज होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे केल्यास भविष्यात जलसंकट निर्माण होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)