लाखो भाविकांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

अंगारक चतुर्थीचे निमित्त : 
खेड : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्‍यातील सिद्धटेकच्या सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील लाखो भाविकांनी दर्शन घेतले.पहाटेपासून सुरू असलेला भाविकांचा ओघ मंगळवारी रात्री चंद्रोदयानंतर ओसरला. भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी योगामुळे दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर लांब रांग लागली होती.

मंगळवारी पहाटे दोनपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. पहाटे साडेपाच वाजता श्री गणेशाची पूजा करून नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी साडेसातपासून भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत गेला. बारामती, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड आदी भागातील कित्येक भाविक सिद्धटेकला मुक्कामी आले होते. देवस्थानचे भक्‍तनिवास तसेच हेमंत मगर यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या योगराज लॉजिंग ऍण्ड गार्डनमध्ये भाविक वास्तव्यास होते. राज्याच्या विविध भागातील सुमारे दोन लाख भाविकांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. रात्री चंद्रोदयानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
चिंचवड देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रही अंगारकी चतुर्थीनिमित्त उघडण्यात आल्याने भाविकांना सुविधा मिळाल्या. चिंचवड देवस्थानच्या वतीने बांधण्यात आलेले शौचालयही दिवसभर सुरू होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन नाही… 
बांधकाम विभागाच्या वतीने भाविकांसाठी लाखो रूपये खर्च करून वाहनतळानजिक सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. मात्र अद्यापही या शौचालयाचे कुलूप उघडलेले नाही.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकतीच सिद्धटेकला भेट दिली.त्यावेळी समितीच्या अध्यक्षा व प्रांताधिकारी यांना भाविकांसाठी शौचालयाचा वापर सुरू करा अशा सुचना दिल्या. मात्र या सुचनेचे पालन झाले नसल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली.

अतिक्रमणे “जैसे थे’ 
सिद्धीविनायक मंदिरासमोर तसेच बाहेर वडाच्या झाडाखाली व्यावसायिकांची अतिक्रमणे “जैसे थे’ आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात गोंगाटाचे वातावरण होते. रसवंतीगृहांच्या इंजिन व घुंगरांचा आवाज, व्यावसायिक, विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी भाविक त्रस्त झाले होते. मंदिरासमोर दगडी फरशीवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला.प्रांताधिकारी,तहसीलदार, नियोजन समितीकडून येथील प्रश्‍नांवर कसलाच निर्णय घेतला जात नसल्याने गणेशभक्‍तांमधून नाराजी व्यक्‍त करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)