लाखो भाविकांच्या उपस्थितीत सेवागिरी रथोत्सव उत्साहात

पुसेगाव  – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांच्या 71 व्या स्मृतिदिनानिमित्त निघालेल्या रथोत्सवात लाखो भाविक सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजता पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांच्या हस्ते रथपूजन झाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रथपूजन सोहळ्यास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, खा. उदयनराजे भोसले, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी आ. बाबुराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार जयश्री आव्हाड, सभापती कल्पना मोरे, सरपंच हेमा गोरे, उपसरपंच प्रकाश जाधव, विराज शिंदे, माजी जि. पं. सदस्य किरण बर्गे, मानाजी घाडगे, राजेंद्र कचरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संतोष तारळकर, शहरप्रमुख राम जाधव, मंडलाधिकारी अमृत नाळे, अरूण माने, प्रा. भानुदास कोरडे, दिनेश देवकर, संजय पिसाळ, रणजितसिंह भोसले आदी उपस्थित होते. शुक्रवारी पहाटे श्रीसेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधीवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज, डॉ. जाधव व सर्व विश्‍वस्तांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रपदेश आदी राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटे पासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली. सकाळी अकरानंतर भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता. रथपूजनानंतर रथ गावातून प्रदिक्षणेसाठी मंदिराबाहेर निघाला व त्यानंतर रथाच्या सवाद्य मिरवणूकीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी लेझीम व बॅंड पथके होती. लाखो भाविकांनी 1 रूपयापासून 1 हजार रूपयापर्यंत नोटांचे हार भक्तिभावाने व श्रध्देने रथावर बांधले.

श्रीसेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे, मिठाई व गुलालाची उधळण करण्यात आली. नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रथदर्शनानंतर भाविकांची पावले यात्रा स्थळाकडे व श्रीसेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती. त्यामुळे यात्रास्थळही गजबजून गेले होते. रथोत्सवादिवशी आलेल्या सर्व भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येत होता. यात्रेनिमित्त यात्रास्थळावर स्टेशनरी, सौदर्यप्रसाधने, पाळणे, मिठाई, हॉटेल, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत.

पोलिस दलाची मोठी कुमक
अनुचित प्रकार घडू नयेत व यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे यात्रेकरुंना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे. जनावरांचीही मोठया प्रमाणावर आवक यावेळी झालेली असून खरेदी-विक्रीची उलाढाल सुरू झाली आहे. जातिवंत जनावरांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार असून त्यासाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)