लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाची यात्रा संपन्न

कोल्हापूर – चांगभलं चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी इथल्या  दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा आज उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेश इथून लाखो भाविकांनी दख्खनच्या राजाच दर्शन घेतलं. या यात्रेच्या निमित्ताने अखंड वाडी रत्नागिरी गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघाली आहे.

आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या.  कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर अक्षरश: फुलून गेला होता. सासनकाठी नाचविताना हलगी घुमक, कैताळ, झांज ढोल,ताशाच्या गजराने डोंगरालाही ताल धरायला लावला. जोतिबाच्या भक्तीत लीन झालेले भक्त वाद्यवृन्दाच्या निनादात देहभान विसरून सासनकाठ्यांचा बॅलन्स सांभाळत नृत्य करणारे भक्त असं चित्र याठिकाणी पाहायला मिळालं. पहाटे शासकीय पूजा, अभिषेक झाल्यानंतर जोतिबाचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.भाविकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावून जोतिबाचे दर्शन घेतले. दुपारी मानाच्या सासनकाठ्यांची पूजा करून सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले .

छायाचित्र- राज माकानदार , कोल्हापूर

सासनकाठ्यांची मिरवणूक जोतिबा मंदिर ते यमाई मंदिपर्यंत जाते. यामध्ये मानाच्या निनाम ,किवळ , विहे , कसबे डिग्रज, करवीर संस्थान, कसबा सांगाव,किवळ, मोजे वाडी रत्नागिरी, कोडोली, मनपाडळे, फाळकेवाडी, दरवेस पाडळी, विठ्ठलवाडी, बागणी, आष्टा यांसह शंभरावर सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांनी श्री दर्शन,  दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक आणि सायंकाळी पालखीचे दर्शन घेऊन आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करून परतीचा मार्ग धरला.  महाराष्ट्राच्या कानाकोऱ्या सह कर्नाटक आंध्रप्रदेश इथून लाखो भाविकांनी  दर्शन घेत समाधान व्यक्त केलं.

यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस व जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि  सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. पोलीस, होमगार्ड, एसआरपी, व्हाइट आर्मी व सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक भाविकांच्या रांगा लावून सर्व व्यवस्था पाहत होते. बाहेरगावावरून आलेल्या भाविकांनी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. करवीर दर्शनाचाही लाभ घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)