लाखेवाडीत भवानी मातेची यात्रा उत्साहात

रेडा- लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानी माता देवीचा यात्रा महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात, परंपरागत नियम जपत साजरा करण्यात आला. तर महोत्सवानिमिता भरलेल्या यात्रेत कुस्तीच्या मैदानाने हजारोंच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर या महोत्सवाप्रसंगी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही रंगले होते.
मंदिरापासून देवीच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती. या देवीच्या महोत्सावात पहिल्या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक व महापूजा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दिलीपराव ढोले व त्यांच्या पत्नी सहाय्यक विक्रीकर आयुक्‍त सुजाता ढोले या उभयांताच्या हस्ते करण्यात आली. कराड येथील बॅन्ड पथकाने दिवसभर येणाऱ्या भाविकांचे जंगी स्वागत करून मनोरंजन केले. संध्याकाळी मंदिरापासून देवीच्या पालखीला सुरुवात झाली ही पालखी ढोल ताशांच्या गजरात, फटाकयांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव दिवाळी प्रमाणे सजले होते. पालखीचे सुवासिनींनी पालखीचे औक्षण कले. तर पालखी मंदिरापर्यंत आल्यानंतर सामुदायिक महाआरती करण्यात आली संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुसऱ्या दिवशी जयभवानीगड केसरी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरवण्यात आले. शंभरच्या जवळ्पास या कुस्त्यामध्ये मल्यांनी सहभाग नोंदवला.विशेष उल्लखनीय बाब म्हणजे महिला कुस्त्या घेण्यात आल्या. प्रत्येक कुस्तीसाठी आकर्षक बक्षीस देऊन शेवटी मनाच्या तीन कुस्त्या घेण्यात आल्या त्यामध्ये प्रथम पारितोषिकाची कुस्ती सोनाई कुस्ती केद्रांतील संतोष जगतापने पुण्यातील मल्ल भुषण शिवतारे याला चितपट करीत “जयभवानीगड केसरी’ किताब, चांदीची गदा, रोख रक्कम स्वरूपात बक्षीस पटकविले. या कुस्त्याचे समालोचक शंकर पुजारी यांनी केले.संध्याकाळी वैभव ऑर्केस्ट्रॉचा कार्यक्रम होऊन समारोप झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)