लाखेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप

रेडा- लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद वाटप करून या सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी सकाळी काकड आरती, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज (सोमवार) हभप मदने महाराज (राहुरी) यांचे काल्याचे किर्तन झाले तर लाखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत ढोले, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच वामन थोरवे, हभप नंदकुमार अरगडे यांनी केले. दरम्यान, हरीनामाचा गजर करीत गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)