लाखणगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात

  • 25 ते 25 रुपये किलो दराने विक्री शेतकऱ्यांना ठरतेय फायदेशीर
  • भुईमुगाचा पाला पावसाळ्यात जनावरांसाठी

लाखणगांव – उन्हाळी भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून, प्रति किलो 25 ते 35 रुपये या दराने भुईमुगाची विक्री होत आहे. भुईमुगाचा पाला पावसाळी हंगामात जनावरांना सुका चारा म्हणून वापरता येत असल्यामुळे भुईमूग पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात भुईमूग काढणीला वेग आला आहे. काठापूर, पोंदेवाडी, लाखणगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जास्त उत्पादन आणि हमखास मिळणारा भाव यामुळे उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी घेत असतात. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून अजून एक महिना ते दीड महिना भुईमुगाची काढणी सुरू राहणार आहे. सध्या 20 ते 35 रुपये प्रति किलो या दराने मंचर बाजार समितीत भुईमुगाची विक्री होत आहे.येणाऱ्या काळात भुईमुगाच्या मागणीत वाढ होईल आणि पाऊस पडल्यानंतर बाजारही वाढेल. असे व्यापारी नीलेश करंडे यांनी सांगितले.
उन्हाळी भुईमुगाचा पालाही गुरांना चारा म्हणून उपयोगात येत असतो, तसेच अतिशय कमी भांडवलावर भुईमुगाचे पीक येते, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणारे शेतकरी भुईमूग पिकाची लागवड करतात. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली असून, शेतकरी भुईमुग काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)