लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथे आठवडे बाजाराचा शुभारंभ व्यापारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. हा आठवडे बाजार दर सोमवारी भरणार असल्याचे सरपंच दस्तगिर मुजावर यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रामसेविका एस. टी. भाईक, किसन टाव्हरे, मनोज रोडे पाटील,महादेव कानसकर,धनंजय पाटील,गणेश दौड,रावसाहेब कोल्हे,संतोष पोंदे, विठ्ठल कानसकर, संतोष मंडलिक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लाखणगाव ग्रामपंचायतीने आठवडे बाजार सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची होती. त्यानुसार ग्रामपंचायत सहकारी सदस्य व ग्रामस्थ तसेच विशेष करुन महिलांनी या आठवडे बाजारात तरकारी माल खरेदी करुन बाजार यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तसेच व्यापारी वर्गाने सर्व प्रकारचा भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी आणली होती. देवगावं, रोडेवाडीफाटा, चांडोह, काठापूर येथील ग्रामस्थ विशेषतः महिला भगिनी भाजीपाला खरेदीसाठी आल्या होत्या. दर सोमवारी आठवडे बाजार सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत भरणार आहे. बाजारात व्यापारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तुर्त कोणताही कर ग्रामपंचायत आकारणार नसल्याचे सरपंच दस्तगिर मुजावर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)