लाखणगावच्या नवनिर्वाचित सदस्यांना सत्कार

मंचर- लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार प्राजक्ता शिरीषकुमार रोडे पाटील व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सत्कार करण्यात आला.
येथील ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्य पदाच्या नऊ जागापैकी आठ जागा जिंकुन शिवसेनेचा दारुण पराभव केला होता. नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता रोडे पाटील व सदस्य दस्तगीर मुजावर, बाळासाहेब धरम, प्रमोद भागवत, अर्चना दौंड, साधना आरगडे, वंदना पडवळ, दिपाली वाघमारे, सुवर्णा पडवळ या सर्वांचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील, सतीश रोडे पाटील, अशोक भागवत, शिरीष रोडे पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)