‘लाईफ इन मेट्रो’च्या सिक्वेलमध्ये अभिषेक व इलियाना

2007 मध्ये प्रदर्शित झालेला अनुराग बासु दिग्दर्शित ‘लाईफ इन मेट्रो’ हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
शिल्पा शेट्टीच्या अदाकारीमुळे त्याबाबत खूप चर्चा झाली होती. तब्बल अकरा वर्षानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिना कपूर, सैफ अली खान, राजकुमार राव या कलाकारांची या चित्रपटात वर्णी लागली आहे.

आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अभिषेक बच्चन व इलियानाचीही एन्ट्री होणार आहे. बऱ्याच काळापासून इलियाना चित्रपटांपासून लांब आहे. या बातमीला अद्याप या दोघांनीही दुजोरा दिला नाही, पण या चित्रपटाची प्राथमिक कथा त्यांना आवडली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या चित्रपटासाठी इलियानाही उत्सुक आहे. अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांना या सिक्‍वेलसाठी विचारण्यात आले होते.

मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता अभिषेक आणि इलियानाकडे हे रोल आले आहेत. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर दिग्दर्शक अनुराग बासु सध्या काम करत आहेत. ‘लाईफ इन मेट्रो’चा हा सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)