लांबपल्ल्यांच्या गाड्यांना आधुनिक कोचेस बसवणार 

संग्रहित छायाचित्र.....

नवी दिल्ली – देशातील सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना आधुनिक पद्धतीचे एलएचबी डबे बसवले जाणार आहेत अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या संबंधात सरकारी पातळीवरून जी आश्‍वासने दिली गेली आहेत त्याची पुर्तता आम्ही निश्‍चीतपणे करू अशी ग्वाहींहीं त्यांनी दिली.

आठवड्यापुर्वी गुवाहाटी येथे रेल्वेच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली त्यात लांबपल्ल्याच्या सर्वच गाड्यांचे डबे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून आज देशातील जवळपास अशी सर्व क्रॉसिंग बंद करण्यात आली आहेत त्यामुळे रेल्वेच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे असे ते म्हणाले. रेल्वे अपघातांच्या प्रकरणात रेल्वेकडून ज्यांना नुकसान भरपाई देणे अगत्याचे आहे त्या सर्व प्रकरणात संबंधीतांना रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाईल असे ते म्हणाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)