लांडेवाडीत वाहतूक नियंत्रक दिव्याची मागणी

भोसरी – लांडेवाडीतून पुणे-नाशिक महामार्गावर जाणाऱ्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवा नसल्याने भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे येथे वाहतूक नियंत्रक दिवा बसविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

लांडेवाडीकडून पुणे-नाशिक महामार्गावर तसेच भोसरी औद्योगिक परिसरात जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. जवळच राजमाता महाविद्यालय आहे. शितलबाग, आपटे कॉलनीतून राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोछ्या प्रमाणावर आहे. कामगार वर्गाचाही या मार्गावर कायम राबता असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरी उड्डाणपूल उतरुन वाहने वेगाने येत असतात. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. वाहतूक नियंत्रक दिवा नसल्याने मनमानी पद्धतीने वाहने दामटली जातात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे याठिकाणी वाहतूक पोलीस नेमावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)