लहुजी शक्ती सेनेने उपोषण मागे

नायगाव- मागील 8 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण लहुजी शक्ती सेनेने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी न करणऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी क्रांती सेनेच्या वतीने सासवड येथील तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू होते. अखेर प्रशासनाने संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले गेले.
मागील 8 दिवसांपासून क्रांती सेनेचे जिलाध्यक्ष मस्कु शेंडगे व कार्यकर्ते उपोषण करत होते. क्रांती सेनेने पर्यावरणास कारणीभूत ठरणाऱ्या बोअरवेलवर बंदी घालणे, भुलेश्वर घाटाची दुुरूस्ती व वनपुरी जवळ गतिरोधक बसवणे, वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करणे, अवैध धंदे बंद करणे, संसद भवन, विधान भवन व सासवड नगर पालिकेसमोर क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याबरोबरच क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी संबंधित मागण्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. तसेच 15 दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेनेने दिला आहे. यावेळी नायब तहसीलदार धनंजय जाधव, लिपिक राजेश रणदिवे, राहुल भोंडे, संदिप भोंडे, आशिष शेंडगे, मंगेश शेंडगे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)