लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

पिंपरी – आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान, भोसरी यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका कोमलताई साळुंखे यांनी केले. आद्य क्रातींवीर लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान व वस्ताद ग्रुप या नामफलकाचे उद्‌घाटन प्रमुख वक्‍ते महाराष्ट्र मजूर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते अजय साळुंखे अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे अध्यक्ष विजय उपाडे, संतोष लोंढे, कचरू ओव्हळ, संदीपान झोंबाडे, अण्णा कसबे, सर्वजीत बनसोडे, खाजा भाई शेख, महादेव सुर्यवंशी, रवी पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सनई-चौघडा वादक पाचंगे सर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. वस्ताद ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अजिंक्‍य उपाडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)