लहान वयातच मुलांसाठी पीपीएफ खाते उघडणे फायदेशीर (भाग-१)

ज्यांना गुंतवणूक करताना जोखीम घ्यायची नाही, पण दीर्घकालीन गुंतवणूक करून मुलांसाठी मोठा निधी उभा करायचा आहे, त्यांना मुलांचे लहानपणी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) चे खाते काढण्यासारखा सुरक्षित गुंतवणुकीचा दुसरा मार्ग नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (पीपीएफ) नियमानुसार  तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या अल्पवयीन अपत्यासाठी खाते उघडू शकता. लहान वयातच मुलांसाठी पीपीएफचे खाते उघडण्याचे अऩेक फायदे आहेत.

सगळ्यात ठळक फायदा म्हणजे पीपीएफ खात्यातील रक्कम 15 वर्षे (लॉक इन पिरियड) काढता येत नाही. खाते उघडल्यानंतर 15 वर्षांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यातील रक्कम काढता येते. त्यामुळे तुमच्या अपत्यासाठी तुम्ही तिच्या/त्याच्या कमी वयात पीपीएफ खाते काढले तर अपत्य सज्ञान (अठरा वर्ष पूर्ण) नोकरी-व्यवसाय सुरु करेपर्यंत पंधरा वर्षे होत आलेली असतील आणि मॅच्युरिटीनंतर रक्कम काढून खाते बंद करता येते किंवा ते खाते पुढे चालू ठेवले तरी कमी वयातच मुलाच्या खात्यात घसघशीत रक्कम जमा झालेली असते आणि त्यात आणखी वाढ करत राहण्याची प्रेरणा त्याला मिळते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लहान वयातच मुलांसाठी पीपीएफ खाते उघडणे फायदेशीर (भाग-२)

तुमचे स्वतःचे खाते आणि अपत्याचे खाते अशा दोन्ही खात्यात मिळून तुम्हांला आर्थिक वर्षात रु. दीड लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करता येत नाही. कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळण्यासाठी पीपीएफ खात्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)