लहान मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास कोठडी

पुणे, दि. 20 (प्रतिनिधी) – घरात झोपलेल्या सहा वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस

कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी दिला आहे. कुलदीप बाबुराव जाधव (वय 32, रा. बिबवेवाडी, मूळ. कर्नाटक) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्या मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 जून रोजी रात्री 12.45 ते 1.15 या कालावधीत घडली. फिर्यादी कुटुंबियांसह घरी झोपले होते. त्यावेळी जाधव याने फिर्यादींच्या क्विन्स गार्डन येथील घरात घुसून त्या मुलीला बाहेर घेऊन आला. तेवढ्यात त्या मुलीच्या आईला जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील सर्वजण उठले. त्यावेळी जाधव मुलीला पळवून नेत असल्याचे त्यांना दिसले. या सर्व फिर्यादींनी पाठलाग करूना जाधव याला पकडले. पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी पोलिसांनी जाधव याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी लहान मुलगी पळविण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता. याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)