लहान मुलांमधील मधुमेहाची समस्या

टाईप-1 मधुमेह झालेल्या लहान मुलांना किंवा मोठयांना तो नियंत्रित ठेवण्यासाठी रोज इन्सुलिनचे इंजेक्‍शन घ्यावे लागते. लहान मुलांच्या बाबतीत हे फारच त्रासदायक होते. आता इंजेक्‍शनपासून बचाव करणे शक्‍य झाले आहे आणि यामुळे टाईप-1 मधुमेहाचे नियोजन कमी त्रासदायक व सोपे होते. भारतात 97 हजार बालके टाइप-1 मधुमेहाने त्रस्त आहेत. हा एक ऑटोइम्युन आजार आहे, ज्यात आजारी व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता त्याच्या पॅनक्रियामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना नष्ट करून टाकते.

यामुळे बालकांचे आयुष्य इन्सुलिनच्या इंजेक्‍शनवर अवलंबून राहते. टाइप-1 मधुमेहाने त्रस्त बालकांच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचे इंजेक्‍शन घेणे खूप आवश्‍यक असते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हायपर ग्लॅसिमिया होतो आणि त्यावर उपचार केले नाही तर किटोसिस आणि किटोएसिडोसिस होतो. टाइप-1 मधुमेहाने त्रस्त बालकांना वाचविण्यासाठी व त्यांच्या शरीरातील मेटाबोलिक प्रक्रिया सामान्य पद्धतीने व्हाव्या यासाठी दररोज अनेक वेळा इन्सुलिन द्यावे लागते. आता इन्सुलिन पम्प उपकरण आणि ग्लुकोज मॉनिटिरग सिस्टीम उपलब्ध झाल्यामुळे बालकांमधील टाइप-1 डायबिटीजचे नियंत्रण पूर्वीपेक्षा अधिक सोपे व कमी त्रासदायक झाले आहे आणि यामुळे डायबिटीजने त्रस्त बालकांच्या जगण्याचा दर्जाही वाढतो.

इन्सुलिन पंप आल्यामुळे जगण्याचा दर्जा व सोय तर वाढली आहेच, पण यामुळे रुग्णाला सातत्याने इंजेक्‍शन घेऊन फिरण्याची गरजही उरलेली नाही. हे पोर्टेबल उपकरण असल्याने बालकांच्या जीवनचर्येवर त्याचा काही फरक पडत नाही. इन्सुलिन पंप उपकरण मुलांमधील शारीरिक सक्रियता व त्यांच्या गरजेनुसार योग्यवेळी इन्सुलिनचा डोस शरीरात जातो आणि कोणत्याही वेळी, कुठल्याही परिस्थितीत याद्वारे इन्सुलिन देणे सोपे आहे. इन्सुलिन पंप उपकरणामुळे टाइप-1 मधुमेहाने त्रस्त रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा मोठया प्रमाणात सुधारतो.

– डॉ. अभिषेक कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)