लहान मुलांनी चांगले गुण अंगीकारावे -लुसि कुरियन

शिक्रापूर-लहान मुले म्हणजे उद्याचे भवितव्य आहे. त्यांना लहानपणी चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. लहान मुलांनी देखील स्वतः चांगले काही शिकून इतरांना देखील त्याप्रकारे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी लहान मुलांनी चांगले गुण अंगीकारणे गरजेचे असल्याचे मत समाजसेविका माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी व्यक्त केले.
आपटी (ता. शिरूर) येथे लहान मुलांना त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या वागणुकीची तसेच योग्य दिशा मिळवून देण्यासाठी दहा दिवस उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी लुसि कुरियन बोलत होत्या. या प्रसंगी माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश दुतोंडे, विक्रम भुजबळ, आपटीच्या सरपंच मुमताज पठाण, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहिनी ढगे, अतुल शेळके, चंद्रकांत पवार, माया शेळके, संगीता गुलदेवकर, सानिफ खान, श्रीवस तमंग, विनायक गाडे यांसह आदी उपस्थित होते. माहेर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उन्हाळी शिबिरात मुलांना विविध खेळ शिकविण्यात आले. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळविण्यासाठी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना माहेर संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर यावेळी लहान मुलांना त्यांच्या जीवनाची वाटचाल करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत सरपंच मुमताज पठाण यांनी व्यक्त केले, आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबीर यशस्वी होण्यासाठी रमेश दुतोंडे, विक्रम भुजबळ, अतुल शेळके, माया शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल शेळके यांनी केले तर माया शेळके यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)