लहान मुलांच्या लठ्ठपणावर वेळीच उपचार होणे आवश्यक- गिरीष महाजन

रुग्णांना आवश्यकता भासल्यास शासनातर्फे सामाजिक दायित्वनिधी अंतर्गत मदत 

मुंबई:  शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही लहानमुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधनासाठी तसेच ज्या बाल रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना आवश्यकता भासल्यास शासनातर्फे सामाजिक दायित्वनिधी अंतर्गत मदत मिळवून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनामार्फत ‘फाईट ओबेसिटी’ या उपक्रमांतर्गत लठ्ठपणाच्या समस्येवर सातत्याने काम करण्यात येत आहे. या अंतर्गतच लहानमुलांच्या लठ्ठपणावर लक्ष केंद्रीत करून काम करण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ.संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे आज अनावरण करण्यात आले, त्यावेळी श्री.महाजन बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते अमिर खान उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सुमारे 22 टक्के लहान मुलं ही लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धती, बदललेली जीवन शैली आणि काही वेळा परिवारातील जीन्स मुळे लठ्ठपणा संभवतो. त्याच्या दुष्परिणामाने हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार बळावतात. दिवसेंदिवस मोबाईलच्या वाढलेल्या वापरामुळे मुलं मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शारीरिक व्यायाम न मिळाल्याने लठ्ठपणा वाढतो आहे. डॉ.बोरुडे यांच्या उपक्रमामुळे देशातीलच नव्हे तर जगातील मुलांच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)