लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर दोन कुटुंबातील हाणामारीत

पुणे – लहान मुलांमधील भांडणाचे पर्यवसन दोन कुटुंबातील हाणामारीत झाल्याचा प्रकार शिवाजीनगर कामगार पुतळा येथे घडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाने परस्पर विरोधी तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी शालन साठे व सुनील बागुल यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. शालन साठे (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा गणेश साठे यास सुयाने हातावर वार करून जखमी केले. तसेच त्यांचे पती, सून व नात यांना हाताने मारहाण करून जखमी करण्यात आले. तर सुनील बागुल (वय 42, रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरात 5 ते 6 जणांनी घुसून त्यांना व पत्नीस कोयत्याने मारहाण करण्यात आली. यानंतर परिसरात दहशत माजवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबातील लहान मुलांमध्ये सकाळी भांडणे झाली होती. दोन्ही कुटुंब मोलमजुरीचे काम करतात. सायंकाळी कुटुंबातील सदस्य घरी आल्यावर त्यांच्यामध्ये मुलांमधील भांडणावरून भांडणे झाली. या दोन्ही प्रकरणाचा तपास अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक एच. एस. गिरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. शिंदे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)