लहान मुलांचा काश्मिरमध्ये हिंसाचारासाठी दहशतवादी संघटनांतर्फे वापर

संयुक्त राष्ट्र : काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे. काही राज्यांत नक्षलवादीही अल्पवयीन मुलांचा असा वापर करीत आहेत, असेही संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अल्पवयीन मुले व हिंसाचार यांच्या संबंधातील वार्षिक अहवालामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना दोषी ठरवले आहे. पाकिस्तानात या संघटनांना आश्रय मिळत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. अशा दुष्कृत्यांसाठी जगभरातील विविध देशांमध्ये किमान १0 हजार अल्पवयीन मुलांना वापरण्यात येत असल्याचे हा अहवाल सांगतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकूण वीस देशांतील अनेक दहशतवादी संघटना हिंसाचारासाठी अल्पवयीन मुलांचा हिंसाचारासाठी वापर करीत असून, त्यात भारत, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन, फिलिपाइन्स व नायजेरिया यांचा समावेश आहे. भारतीय लष्कर व दहशतवादी संघटना यांच्यातील हिंसक घटनांमध्ये मुलांचा बळी देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

काश्मीरबरोबरच छत्तीसगड व झारखंड या राज्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. छत्तीसगड व झारखंड या दोन राज्यांमध्ये नक्षलवादी गट अल्पवयीन मुलांना हिंसाचारात सहभागी करून घेत आहेत, त्यांना शस्त्रे देत आहेत. त्यामुळे नक्षलवादीविरोधी कारवायांमध्ये लहान मुलांचाही बळी जात आहे, असे हा अहवाल सांगतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)