लहानमुलांना 20 फुटावर चढविण्यात साहस काय?

हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल ः दहीहंडीला साहसी प्रकार कसे काय ठरवता?

मुंबई- पारंपारीक उत्सव असलेल्या दहीहंडी उत्सव वाचविण्यासाठी साहसी प्रकारामध्ये समाविष्ट करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमके काय? दहीहंडीला साहसी प्रकार कसे काय ठरवता? वर्षांच्या चिमुकल्याला 20 फूटांच्या मानवी मनोऱ्यावर चढवणे यात कसले साहस? साहसी क्रीडा प्रकाराच्या नावाखाली न्यायालयाचे नियम पायदळी तुडवायचे आहेत का? असे प्रश्‍न उपस्थित करून न्यायालयाने याबाबत सरकारला उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे

ज्या लहान मुलांना आपण काय करतो हेच माहित नाही. त्या मुलांना 20 फुटाच्या थरावर चढविण्यात साहस काय आहे, अशी विचारणाही न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडे केली.
दहीहंडी उत्सवादरम्यान न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठात आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने दहिहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी न्यायालयाने साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमके काय, दहीहंडी हा साहसी प्रकारात कसा काय समावेश होतो. तसेच त्या छोट्या मुलांना या साहसा प्रकाराची माहिती किंवा जाणीव नाही. आपण काय करतो हेच जर त्या मुलाला कळते नसेल, तर त्यांना 20 फुटाच्या थरावर चढविणे हा साहसी खेळ आहे काय, अशी विचारणा न्यायालयाने केली.

आशिष शेलारांन मागितली माफी
मागिल सुनावणीच्यावेळी न्यायालयाने गणेश पांडे यांनी खार येथे आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात 20 फुटा पेक्षा जास्त उंचीचे थर लावण्यात आल्याने आणि या कार्यक्रमाला आशिष शेलार उपस्थित राहील्याने पांडे यांच्यासह शेलार यांना अवमान नोटीस बजावण्याचे होती. त्या नोटीसीला उत्तर देताना शेलार यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माफी मागितली. आपल्याला निमंत्रण होत म्हणून गेलो होतो. न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, अशी भूमीका घेतली. यावर न्यायालयाने आपण समनवय समितीचे अध्यक्ष आहात. केवळ निमंत्रण आल्यावर जाण्यापूर्वी भान ठेवा. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणाऱ्या ठिकाणी हजर राहणे टाळा. तशा दहीहंडींच्या आयोजनात सहभागी होऊ नये, अशा शब्दांत कानपिचक्‍या दिल्या.

*सरकारची अधिसूचना
उच्च न्यायालयाने 2015 मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करताना काही निर्बंध घातले. त्यावर राज्य सरकारने त्याच वर्षी 11 ऑगस्ट रोजी दहीहंडीला साहसी खेळ म्हणून जाहीर करत अधिसूचना जारी केली. सरकारने या उत्सवात 11 वर्षांवरील अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेण्यास मुभा दिली. मात्र त्यासाठी पालकांच्या अनुमतीचे पत्र बंधनकारक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)