लहानग्यांची चंगळ! रंगीबेरंगी मासे पाहण्याचा उत्साह

संभाजी उद्यानातील मत्स्यालयाला तीन महिन्यांत 17 हजार जणांची भेट

पुणे – संभाजी उद्यानातील मत्स्यालयला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मत्स्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत 17 हजारपेक्षा जास्त नागरिकांनी येथे भेट दिली आहे. विशेषत: मत्स्यालयाचे बदललेले रुप आणि पाण्यात मस्तपैकी पोहणारे रंगीबेरंगी मासे बच्चे कंपनीच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.

23 पेक्षा जास्त प्रजातींचे मासे
शहरातील एकमेव असलेले हे मत्स्यालय महापालिकेच्या उद्यान विभागाने 17 ऑक्‍टोबर रोजी खुले केले. मत्सालय आहे. नवीन स्वरूपात आणि अधिक विस्तृतपणे उभारलेल्या या मत्स्यालयात ऑस्कर, टेट्रा, टायगर शार्क, डिस्कस, अरवाना अशा 23 पेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी प्रजातींचे मासे पाहायला मिळतात. यातील जायंट गौरामी या माशाची गेली दहा वर्षे मत्स्यालयात संगोपन केले जात आहे. रंगीबेरंगी मासे, मत्स्यालयाची आकर्षक रचना यामुळे या संग्रहालयास पुणेकरांची मोठी पसंती मिळत आहे.

सध्या दररोज 200 ते 300 नागरिक मत्सालयाला भेट देतात. येथील बरेचसे काम अजून बाकी आहे. पुढील काही महिन्यांत आणखी चांगल्या स्वरूपात मत्स्यालयाचा विस्तार होणार आहे.
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक.


लहान मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिक मत्स्यालयाला भेट देतात. माशांची देखभाल, त्यांच्यासाठी आवश्‍यक साधने, यंत्रणा, माशांचे आजार, त्यावरील उपचारांबाबत अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकही येथे आवर्जून भेट देतात. विशेषत: दिवाळी आणि उन्हाळी सुट्‌टयांत भेट देणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असते.
– अभय कौलगुड, मत्स्यालय अधिकारी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिन्यानुसार भेट देणाऱ्यांची संख्या :
जानेवारी – 5500
फेब्रुवारी – 6500
मार्च – 6000


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)