“लहंगा चोळी’मध्ये कियारा अडवाणीचा देसी अंदाज

फुगली, एम. एस. धोनी, मशीन, लस्ट स्टोरीज अशा चित्रपटात आपल्या हॉट लूकने कियारा आडवाणी हिने सर्वांना घायाळ केले होते. याशिवाय काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बिकनीतील फोटोमुळे ती खूपच चर्चेत आली होती. कियारा ही आपल्या टोंड बॉडी आणि सुंदरतेमुळे खूपच प्रसिद्ध आहे.

कियाराने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, त्यात तिचा अंदाज एकदम हटके होता. या फोटोत कियाराने काळ्या रंगाची चोळी आणि लहंगा घातलेला होता. तसेच डोळ्यावर चष्मा असलेली कियारा दबंग स्टाईल पोज्‌ देताना झळकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कियाराचा हा देशी लुक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा हॉट फोटो तिच्या एखाद्या चित्रपटातील गाण्यातील असल्याचे वाटते. नववर्षानिमित्त कियाराने आपल्या वॅकेशनदरम्यान बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्याला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

दरम्यान, वेब सीरिज “लस्ट स्टोरीज’मध्ये कियारा झळकली होती. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे सर्वांनीच भरभरून कौतूक केले होते. याशिवाय कियाराचा “कलंक’ आणि “कबीर सिंह’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. “कलंक’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट, तर “कबीर सिंह’मध्ये शाहिद कपूरसमवेत कियारा झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)