लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती

पुणे – केंद्र व राज्य शासनाकडून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पहिल्या दिवसापासून आघाडी घेत, तब्बल 10 लाख 93 हजार 544 बालकांना लस देऊन तब्बल 105 टक्‍के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दरम्यान, लसीकरणातून सुटलेल्या बालकांना दि.15 जानेवारीपर्यंत लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून राज्यासह देशात ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गोवर-रूबेला लस ही बालकांसाठी आवश्‍यक असून, न्यूमोनिया, अतिसार, मेंदू संसर्ग यासारख्या प्राणघातक आजारापासून संरक्षण मिळते. त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला ही लस दिली जात आहे. शहरात एका ठिकाणी मुलांना लसीकरणानंतर उलट्या, चक्‍कर येण्याचे प्रकार घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचा परिणाम जिल्ह्यात होऊ नये यासाठी डॉक्‍टर, परिचारिका आणि नागरिकांनी पालकांमध्ये जनजागृती केली. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करून, पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये मुलांना लस देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल 60 हजार बालकांना लस देण्यात आली. त्यासाठी डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्यात लसीकरणाची गती अधिक असून, दि.10 जानेवारी 2019 पर्यंत जिल्ह्यातील उद्दिष्ट पूर्ण करून बांधकाम साईट, कारखाने आणि शहरालगत असलेल्या बालकांना लस देण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.
जिल्हाभरातील 10 लाख 40 हजार मुलांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात उसतोड कामगार, बांधकाम कामगार आणि अन्य मुलांनादेखील जिल्हा परिषदेने लसीकरण केले आहे. त्यामुळे एकूण 100 टक्‍क्‍यांवर ही उद्दिष्टपूर्ती होऊन हे प्रमाण 105 टक्‍क्‍यांवर पोहचले आहे.

 आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चांगल्या कामामुळे राज्यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पहिल्या स्थानावर आला आहे. त्याप्रमाणे गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेतही वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यासह सोशल मिडिया आणि पालकांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

– डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)