लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या

उपसभापती अंजनाताई कदम यांचे आवाहन

पाचगणी – गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिम आरोग्य विभागामार्फत सुरु झाली असून या मोहिमेदरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुला-मुलींना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. ही लस सर्व खासगी शाळा व शासकीय शाळांमध्ये देण्यात येणार आहे. तालुक्‍यातील एकही मुल या लसीकरणापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता सर्वानी घ्यावी, असे आवाहन महाबळेश्‍वर पंचायत समितीच्या उपसभापती अंजनाताई कदम यांनी केले. तळदेव (ता. महाबळेश्‍वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करून विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्याचा शुंभारंभ करण्यात आला.यावेळी सौ. अंजनाताई कदम बोलत होत्या.

-Ads-

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉक्‍टर सुधाकर कोकणे, तळदेवचे सरपंच रामचंद्र जंगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाळे, ग्रामसेवक सौ. चौरे, आरोग्य सहाय्यक उज्वल कुरणे, परिचारिका कोमल इथापे व कोमल दारसिंबे आदी, रश्‍मी काळे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सुधाकर कोकणे म्हणाले, आपल्या भारत देशाने गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्‍चय केला आहे. या राष्ट्रव्यापी मोहिमेद्वारे महिने ते वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना लस दिली जाईल. जी मुले शिक्षणापासून वंचित असतील त्या सर्व मुलांना त्यांच्या वस्तीपर्यंत जाऊन लसीकरण केले जाईल.

लसीकरण झाल्यावर त्या लाभार्थी बालकाचे डाव्या हाताच्या अंगठ्यावर मतदान केल्यानंतर करतात तसे मार्किंग केले जाईल. तरी या राष्ट्रीय कार्यामध्ये सर्वाचाच सहभाग व सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगून उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्राथमिक केंद्र तळदेवच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व त्यांनी विश्‍वास विश्‍वास व्यक्त केला. की प्राथमिक तळदेव अंतर्गत सर्व गावांमध्ये ही मोहीम 100 टक्के यशस्वी होईल. त्याचपद्धतीने गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम महाबळेश्‍वर तालुक्‍यातील कुंभरोशी उपकेंनिद्रातर्गत पार येथेही पहिल्याच दिवशी राबवण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)