लष्कर हद्दीत चार संशयित अटकेत

नगर – लष्कराच्या हद्दीमध्ये चार संशयित आढळून आले असून, पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे. दौलसा मख्तुम शेख (वय-23), ख्वाजा मख्तुम शेख (वय-19 दोघे रा. जेवळी, उस्मानाबाद), शहानवाज इस्माईल कुरेशी (वय-20 रा.कुरेशी गल्ली नळदुर्ग उस्मानाबाद), कारभारी इम्रान मुस्तफा (वय-21 रा.सय्यद हिप्परगा,उस्मानाबाद), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुरूवारी येथील बेसिक ट्रेनिंग सेंटर फायरिंग लॉंग रेंज टार्गेट येथे प्रथम ख्वाजा मख्तुम शेख टेहाळणी करीत होता. त्यास पकडून येथे पुन्हा येऊ नकोस येथे खासगी लोकांना येण्यास मनाई आहे. असे सांगून हाकलून देण्यात आले. परंतु नंतर 1 तासाने तो इतर साथीदारांसमवेत तेथे आला. त्यावेळी चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयितांविरूध्द सिक्‍युरिटी गार्ड विजेंद्रसिंह यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील मोबाइल ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)