लष्कर केंद्रांतर्गत काही भागात गुरूवारी पाणीपुरवठा बंद

पुणे – महापालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी काही भागातील पाणीपुरवठा गुरूवार (दि. 20) रोजी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे. शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नंबर 46, साईबाबानगर गल्ली नं. नऊ, दहा, नवाजीश पार्क, डीएड कॉलेज, भाग्योदयनगर गल्ली क्रमांक 29, 30, 31 या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)