लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबईतून अटक

मुंबई : लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले सलीम खान असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

सलीम खान हा उत्तर प्रदेशातील हाथ गावातील रहिवाशी आहे. फैजाबादमधून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा सलीम हा फायनान्सर होता तसेच
सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करत होता. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतले होते. सलीमकडून आणखी माहिती मिळण्यास एटीएसला मदत होणार असून आणखी किती एजंट सलीमसोबत काम करत आहेत, याचीही माहितीमिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)