लष्करी जवानांविरूद्धचे गुन्हे मागे घ्या अन्यथा सरकारच उलथवून टाकू – स्वामी

सुब्रमण्यम स्वामी यांचा मेहबुबा सरकारला इशारा
नवी दिल्ली – काश्‍मीरात शोपियान जिल्ह्यात लष्करावर दगफेक करणाऱ्या जमावावर लष्करी जवानांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन नागरीक ठार झाले आहेत. या प्रकरणात जम्मू काश्‍मीर सरकारने जमावावर गोळीबार करणाऱ्या लष्करी जवानांवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपचे खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारला इशारा देताना म्हटले आहे की सरकारने या जवानांवरील गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत. त्यांनी हे गुन्हे मागे घेतले नाहींत तर राज्यातील सरकारच आम्हाला उलथवून टाकावे लागेल.

आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की हा शुद्ध वेडेपणा असून केंद्राने राज्यातील सरकारच उलथून टाकले पाहिजे. काश्‍मीरात गेल्या शनिवारी हा प्रकार घडला होता. जमावावर केलेल्या गोळीबार प्रकरणात 10 गढवाल युनिटच्या जवानांवर त्याचे नेतृत्व करणाऱ्या मेजरवर राज्य सरकारने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा भीषण प्रकार आहे असे स्वामी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आपण तेथे सरकार कशासाठी चालवत आहोत हे मला अजून समजलेले नाही. जम्मू काश्‍मीरात भाजप-पीडीपी युतीचे सरकार आहे. त्या सरकारवरच स्वामी यांनी जोरदार हल्ला चढवला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)