लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेसाठी कृषी कार्यालयाचे आवाहन 

सातारा – मका पीकावर सध्या अमेरिकन लष्करी अळीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी. अंडीपुंज व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचे नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलेनोमस, चिलोनस) व परभक्षी किटक यांचे संवर्धन करावे.

बीटी (बॅसिलस थुरिनजियेन्सीस), नोमुरिया रिलाय या जैविक किटकनाशकाची फवारणी करावी. केंद्रीय किटकनाशक मंडळ,फरीदाबाद पुढील किटकनाशकाची तात्पुरती शिफारस केली आहे. कार्बोफ्युरॉन 3 टक्के सीजी :33 किलो/हे. फोरेट 10 टक्के सीजी : 10 किलो/हे. थायामिथॉक्‍झाम 12.6+लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेडसी : 125 मि.ली./हे./ 500 लि. पाणी. क्‍लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी :150 मि.ली./ हे./500 लि. पाणी. ही कीड बहुभक्षी खादाड असून प्रसार होण्याचा वेग जास्त असल्यामुळे तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)