लष्कराने दिवसभरात वाचवले 22 हजार लोकांचे प्राण

थिरूवनंतपुरम – या शतकातील सर्वात मोठ्या पुराचा तडाखा बसलेल्या केरळ राज्यातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी लष्कराची फार मोठी यंत्रणा तेथे कार्यरत आहे. लष्कराने दिवसभरात विविध ठिकाणी राबवलेल्या मदत मोहीमेमुळे तब्बल 22 हजार लोकांची सुखरूप सुटका होऊ शकली अशी माहिती तेथील अधिकृत सूत्रांनी दिली.

दरम्यान तेथील पावसाने थोडी उघडीप दिल्याने अनेक ठिकाणचे पाणी ओसरण्यास मदत झाल्याने अनेक भागाला दिलासा मिळाला आहे. पुढील चार दिवस तरी केरळात फार मोठ्या पावसाची शक्‍यता नाहीं असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात मदत कार्याला आणखी वेग येणार आहे. पुरग्रस्त केरळात यापुढील काही दिवस तरी साथीच्या रोगांचा मोठा फैलाव होण्याची शक्‍यता असल्याने त्यादृष्टीनेही आता उपाययोजना केली जात आहे.
गेल्या सुमारे दहा दिवसांच्या पूरस्थितीमुळे अनेक भागातील वाहतूक बंद होती तसेच शेती क्षेत्राचेही यात मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे अनेक भागात जीवनावश्‍यक वस्तुंची टंचाई निर्माण झाली आहे.

-Ads-

अनेक गावांमध्ये भाज्यांची तसेच कांदे बटाटे अशा मूलभूत बाबींची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान कर्नाटकच्या काही भागाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. तेथेही राज्य सरकारने मदत पाठवण्याला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कर्नाटकच्या पुराची दखल घेतली असून या राज्याला आवश्‍यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)