जम्मू – भारतीय लष्कराने आज जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत सज्ज असलेल्या लष्कराच्या जवानांनी संशयास्पद हालचाली हेरल्या. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दहशतवाद्याला आव्हान दिले. त्याने गोळीबार सुरू केल्याने जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यात तो ठार झाला.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील दुसऱ्या घटनेत पोलिसांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली. तौसिफ अहमद गुदना उर्फ अबू बाकर असे त्याचे नाव आहे. किश्‍तवाड जिल्ह्यात दहशतवादी कारवाया घडवण्याच्या कटात तो सामील होता. हिज्बुलमध्ये युवकांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)