लष्करात तीन नवीन तोफा दाखल 

देवळाली – संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भारतीय लष्करात तीन नवीन तोफा दाखल करण्यात आल्या. त्यात एम 777 अमेरिकन लाईट होवित्झर्स आणि के 9 वज्र या तोफखान्याचा समावेश आहे. तोफा वाहून नेणाऱ्या एका वैशिष्ट्यपुर्ण वाहनाचाही यात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येकी अठरा तोफांची एक स्वतंत्र रेजिंमेंट लष्करात तयार केली जाणार असून हे काम पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पुर्ण केले जाणार आहे.

एम 777 तोफांच्या संबंधात भारताने नोव्हेंबर 2016 मध्ये अमेरिकेशी करार केला होता. त्यावेळी या 145 तोफा 5070 कोटी रूपये खर्चुन खरेदी करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने या तोफा इराक आणि अफगाणिस्तान या देशांतील युद्धांत वापरल्या होंत्या. या तोफा अतिशय हलक्‍या आहेत आणि त्या दुर्गम भागात तसेच डोंगराळ प्रदेशात सहज वाहून नेता येण्यासारख्या आहेत. या तोफा हेलिकॉप्टर्स मधूनही नेता येऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)