लष्कराच्या हिट लिस्टवर काश्‍मीरमधील 10 दहशतवादी कमांडर

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – काश्‍मीर खोऱ्यातील दहशवाद्यांनी लोकांना धमकावण्याबरोबर, दहशत पसरवण्याबरोबरच लोकांचे अपहरण करण्याचा सपाटा लावला आहे. शुक्रवारपर्यंत दहशतवाद्यांनी 11 जणांचे अपहरण केल्याची माहिती देण्यात आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपहरण करण्यात आलेले हे सर्वजण पोलीसांचे नातेवाईक आहेत. याबाबत सुरक्षा दलंनी पलटवाराची तयारी केलेली आहे. काश्‍मीरमधील टॉप 10 दहशतवादी कमांडरांची एक हिटलिस्ट तयार करण्यात आलेली असून त्यांच्याविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

हिटलिस्टवर असलेले हे दहा दहशतवादी पुढीलप्रमाणे-
1) झीनज उल इस्लात उर्फ अलकामा -हा शोपियांमधील जनिपोराचा आहे. सर्वाशिक सक्रिय असलेल्या झीनत उल इस्लात अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेला एक सक्रिय दहशतवादी आहे.
2) वसीम अहमद उर्फ ओसामा-ओसामा बिन लादेन च्या नावातील ओसामा हेच टोपणनाव घेतला घेतलेला वसीम अहमद बुरहान गटाचा असून शोपियांचा जिल्हा कमांडर आहे.
3)नावेद जट्ट उर्फ अबू हंजला-श्रीनगरच्या हॉस्पिटलधू पळून जाण्यात यशस्वी झालेला नावेद जटट उर्फ अबू हंजला हा लष्करचा कमांडर आहे. हा बुरहान गटाचा असून पत्रकार शूजात बुखारी यांच्या हत्येत सामील होता.
4) रियाज अहमद नाईकू – हिजबूम मुजाहिदीनचा चीफ कमांडर असलेल्या रियाज अहमद नाईकू सोशल मीडियावर धमक्‍या देण्यासाठी फेमस आहे. हल्लीच त्याने पोलीसांना नोकरी सोडून देण्यासाठी दबावतंत्राचा वार सुरू केला आहे.

5) मनान वानी – शिक्षण सोडून हिजबूलचा दहशतवादी बनलेला मनान कूपवाडा जिल्हा कमांडर आहे.
6) अल्ताफ काचरू आणि 7) जहूर अहमद हे दोघेही हिजबूलचे दहशतवादी आहेत.
8) हाफिझ उमर – जैश चा ऑपरेशनल कमांडर असूना अत्यंत सक्रिय आहे.
9) झाकिर रशीद भट्ट गजावत उल-हिंदचा कमांडर असून लोकांना धमकावण्याचे काम करतो. हा झाकिर मूसा म्हणूनही ओळखला जातो.
10) जावेद मट्टू-हा अल बद्रचा दहशतवादी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)