श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये लष्कराच्या कॅम्पवर आज सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला . या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी कुलगाम येथील स्कॉस्ट रिसर्च सेंटरजवळील लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराकडून गोळीबार सुरु असतानाच दहशतवादी पसार होण्यात यशस्वी ठरले. त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी 17 नोव्हेंबरला कुलगाममधील एका नागरिकाचे अपहरण करून हत्या केली होती. संबंधित नागरिक लष्कराचा खब-या असल्याचा संशय दशहतवाद्यांना होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा