लष्कराचा जवान हिज्बुल मुजाहिदीनमध्ये सामील

श्रीनगर – या महिन्याच्या सुरूवातीपासून दक्षिण काश्‍मीरमधून बेपत्ता असलेला लष्कराचा एक जवान हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इद्रीस मिर असे या जवानाचे नाव असून तो लष्करात जम्मू काश्‍मीर लाईट इंफन्ट्रीमध्ये नियुक्‍त होता. हिज्बुलमध्ये तो कालच सामील झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिर हा या महिन्याच्या सुरूवातीच्या काळात शोपियन भागातून बेपत्ता झला होता. त्याची पोस्टिंग झारखंडमध्ये करण्यात आली होती. यावरून तो नाराज असायचा. आपल्या दोन स्थानिक सहकाऱ्यांसह तो या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र याला लष्कराकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. मिर अजूनही बेपत्ता असून दहशतवादी गटाशी त्याचा संपर्क झाल्याच्या वृत्ताला अधिकृतपणे खरे मानता येणार नाही, असे लष्करी सूत्रांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)