लवकरच सोलापूरहून हवाई वाहतूक कार्यान्वित – प्रधानमंत्री

सोलापूरतुळजापूरउस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद

सोलापूर: ‘सबका साथ सबका विकास’ ही केंद्र सरकारची भूमिका असून त्याला अनुसरुन देशातील गोरगरीब, कामगार, मध्यमवर्गाच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी अधिक गतीने होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासह सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 1 हजार कोटीच्या रेल्वेमार्गास मंजुरी दिल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. याशिवाय, राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडान योजनेतून सोलापूरहून विमानसेवा सुरु होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मलनि:स्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

सध्या देशात रेल्वेबरोबरच विमान वाहतुकीलाही महत्त्व दिले आहे. उडान योजनेंतर्गत विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाला आहे. राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडान योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरु होईल, असा शब्द त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)