लवकरच मुंबई-दिल्ली नवीन एक्स्प्रेस-वे होणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा नवीन एक्स्प्रेस वे पुढील ३ वर्षांत बांधणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.

हा एक्सप्रेस-वे झाल्यानंतर दिल्ली-मुंबई या दोन्ही महानगरांमधील अंतर निम्म्यावर येणार आहे. या प्रवासासाठी सध्या १४५० किमी अंतर कापावे लागते पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वेमुळे १२ तासांवर येईल असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. नवीन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी याआधी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)