लवकरच नाग क्षेपणास्त्र भारतीय सैन्यात दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला संरक्षण क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे दिसत आहे. या मोहिमेंतर्गत 300 नाग रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची निर्मिती झाली आहे. जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या नाग क्षेपणास्त्रांचा लवकरच भारतीय सैन्यात समावेश होणार आहे. या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूच्या रणगाडय़ाच्या ताफ्याला उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय सैन्याच्या क्षमतेत भर पडणार आहे.

सैन्याला नाग रणगाडाविरोधी निर्देशित क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक वाहनाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे.  नाग रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासह एकूण 5 यंत्रणांचा विकास करण्याची योजना डीआरडीओने 1980 च्या दशकात आखली होती. परंतु काही कारणांमुळे ती प्रलंबित होत गेली. संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत 300 नाग क्षेपणास्त्रs आणि 25 नाग क्षेपणास्त्र वाहकांचा भारतीय सैन्यात समावेश करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात आल्याचे समजते. या यंत्रणेची एकूण किंमत सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)