लवकरच उद्योगांसाठी व्हाट्‌सऍप 

बेंगळुरू: भारतात मोठया कंपन्यांना उपयोगी पडू शकणारी वैशिष्ट्ये व्हाट्‌स ऍपमध्ये सामील केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात कंपनीतील कामासाठी न्यू फिचर्स वापरात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ऍपला व्हाटसऍप फॉर बिजनेस या नावाने तयार करण्यात येणार आहे. कंपनी या ऍपच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संवाद साधणारी सुविधा देणार आहे. या सुविधेची सुरुवात देशातील ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीजसाठी मेक माय ट्रीप, सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. औषध कंपन्या आदी व्यवसायांशी निगडीत असलेल्या या ऍपची सुविधा देण्यास सुरुवातीच्या काळात वापर करता येणार आहे. मागील वर्षात काही लहान कंपन्या ग्राहकांना संपर्क करण्यासाठी व्हाट्‌सऍपचा उपयोग केला जात असल्याचे दिसून आले. याचे व्यवस्थापन करून ऍपची निर्मिती केल्यास त्याचा फायदा भारतातील उद्योग क्षेत्राला होणार असल्याचा विश्वास व्हाट्‌सऍपचे सीईओ मॅथ्यू आयदेमा यांनी व्यक्त केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)