ललिता साळवेंवर यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रिया

मुंबई : महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर आज मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वीपणे लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्यात आली. प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सेट जॉर्ज रुग्णालयातील ही पहिलीच लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया ठरली. दरम्यान, लिंगबदलानंतर ललिता या ललित नावाने ओळखल्या जाणार आहेत.

ललिता साळवे मंगळवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आवश्यक तपासण्या पूर्ण करून आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी ८.३० वाजता त्यांना शस्त्रक्रिया विभागात घेण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत शस्त्रक्रिया चालली. ललिता या सध्या शुद्धीवर आल्या असून पुढील तीन दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नाही. डॉ. रजत कपूर यांनी ही शस्त्रक्रिया केली. सहाय्यक डॉक्टर आणि भूलतज्ञ अशा ६ जणांच्या टीमने कपूर यांना साह्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)